विठ्ठला आजपासून जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली.
विठूमाऊली, आज आषाढी एकादशी पासूनच संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट नष्ट कर. जगाला पुन्हा एकदा मोकळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे भाग्य लाभूदे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पहाटे करण्यात आली. पूजेनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना मार्गदर्शन केले.

