Swasthyam 2022 : ध्यान, प्राणायाम, योग आणि सुदृढ आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’

पुणे : आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताणतणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताणतणाव दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर राखण्यासाठी ध्यान-धारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी नागरिकांना शास्त्रीय मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेंतंर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित केला आहे. यात विविध क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.

‘स्वास्थ्यम्’ कशासाठी ?
१. ध्यान धारणेविषयी शास्त्रीय माहिती : मनुष्याला अनेक शारीरिक व्याधी या मनाच्या अस्वस्थतेमुळे होतात. ताणतणाव, मनात सुरु असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे.

२. शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम : शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने शरिरात व्याधी उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे जाणून घेऊ शकता.

३. उत्तम, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योगा : मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींन मानवी जीवनाचं योग्य संतुलन राखलं जात.

४. अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध : अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो. स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरिक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

५. सकस आहार आणि आरोग्य : धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक व सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो.

६. गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध : आपल्या आवडीचं गाणं किंवा संगीत ऐकलं की, मन प्रसन्न होतं, म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आणि गायन- संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.

तीन दिवसांत यांचे मार्गदर्शन व विषय
– डॉ. हंसाजी योगेंद्र : योगासाठी सकस आहार आणि योगातून अध्यात्माकडे
– ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : कला आणि संस्कृतीच्या भारतीय प्रेरणा
– अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला
– योग गुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग
– नूपुर पाटील : सकस, जैविक आहार आणि आरोग्य
– प्रियंका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा
– अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल- योगा आणि फिटनेस
– सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे
– अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्य
– सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन
– डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन
– ‘वेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख ः लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन

‘स्वास्थ्यम्’मध्ये असे व्हा सहभागी…
मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून रजिस्र्टेशन करू शकता.
Website: https://globalswasthyam.com

– व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी /व्यवसाय व संपर्क क्रमांक
– संस्था व ग्रुपच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुपचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक

सौजन्य – सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu