मुले आणि अभ्यास

* मुलांना शिकवा वेळेचे नियोजन –
अभ्यासासाठी दिलेल्या वेळात पुन्हा निरनिराळ्या विषयांसाठी ठराविक वेळ द्यावयास हवा. जो विषय कठीण वाटत असेल त्याला अधिक वेळ द्या.वेळापत्रक तयार करताना महत्वाच्या गोष्टींसाठी प्रथम व अधिक वेळ द्यायला हवा.प्रत्येकाची कार्यक्षमतेची वेळ निरनिराळी असू शकते.कुणी सकाळी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकेल तर कुणी संध्याकाळी.जेंव्हा ग्रहण, स्मरण सर्वाधिक चांगले असेल, विचारशक्ती , तर्कशक्ती अत्यंत जागरूक असेल तेंव्हा कल्पकता अधिक बहरू शकेल.तुमच्या मुलाची अशी वेळ कोणती हे त्याच्या /तिच्या मदतीने शोधून काढा आणि महत्वाचे काम अभ्यास या साठी ती वेळ नियुक्त करा. अभ्यास किती वेळ केला यापेक्षा तो कसा केला, त्याचा दर्जा याला अधिक महत्व आहे.विश्रांतीमुळे मन ताजे तवाने रहाते. चांगल्याप्रकारे एकाग्र होऊ शकते.स्मरण, ग्रहण, विचार, तर्क इ. मानसिक शक्ती वाढवतात.आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोपही घ्यायला हवी.

*अभ्यासाची इच्छा व आवड मुलांच्या मनात निर्माण करा-
अभ्यास मनोरंजक करण्यासाठी चित्रे, नकाशे, तक्ते, पृथ्विगोलासारख्या वस्तू, सहल, गोष्टी सांगणे, टी.व्ही., रेडिओवरील कार्यक्रम, माहितीपट , कोडी, उखाणे, शब्दांची अंताक्षरी वगैरेचा उपयोग करून घेता येईल.अभ्यासाचा व जीवनातील प्रसंगांचा, वातावरणाचासुसंगत वेळ घातल्यासही अभ्यास मनोरंजक वाटतो.आवड निर्माण होते.

*वाचन हे अभ्यासाचे अत्यंत महत्वाचे आयुध-
वाचताना महत्वाचे मुद्दे अधोरेखित करणे, एखादी आकृती, तक्ता तयार करणे , वर्गीकरण करणे, वाचलेली माहिती, ज्ञान सुसंगत-सुसंबद्धपणे मनात साकार करणे, आपल्या पुर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाचा संबंध प्रस्थापित करणे, हेतू लक्षात घेऊन टिप्पणे काढणे इ. केल्यामुळे वाचन उपयुक्त ठरते.शिवाय आकलन, तर्कशक्ती, स्मरणशक्ती ,कल्पनाशक्ती यांनाही धार चढतेव आत्मविश्वास वाढतो.

*मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी –
पुनारोच्चार -पुन:प्रत्यय – पुन:स्मरण महत्वाचे. एखादा तक्ता , सूत्रे , व्याख्या , कविता इ. लिहून अभ्यासाच्या खोलीत बोर्डावर लावल्यास रोज पाहून , म्हणून सर्व सहज स्मरणात राहते.वाचताना -वाचलेले लक्षात राहण्यासाठी सर्वसाधारणपणे पुढील पद्धत अवलंबिली जाते.
१५ मिनिटे वाचन, एखादा मुद्दा विसरला का ते पाहणे, या मुद्द्यासकट पुन्हा एकदा आठवून पाहणे याप्रमाणे सर्व पाठाचे वाचन, त्या नंतर २४ तासाच्या आत किंवा साधारणपणे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुद्दे आठवून पाहणे. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने पुन्हा ….असे केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते.वाचलेल्या मुद्द्यांचे आकलन झाल्यानंतर त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध – संगती लक्षात घेतल्याने साखळीसारखे सर्व लक्षात राहते.आकलन ,सुसंगती , वर्गीकरण ,स्मरणशक्तीच्या बाबतीत अत्यंत महत्वाची ठरतात.एखादे चित्र, आकृती, तक्ता यांच्या सहाय्याने वाचलेल्या गोष्टी चटकन लक्षात राहतात.  
 
आरोग्यासाठी चांगला आहार -पुरेशी झोप-विश्रांती- व्यायाम – मनोरंजन – होकारार्थी भावना उदा. आत्मविश्वास इ. महत्वाचे ठरते. आहाराचा आणि एकंदर मन:शक्तीचा -एकाग्रतेचा -भावनांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला अभ्यासासाठी आणि चांगल्या स्मरण शक्तीसाठी चौरस आहाराची अत्यंत आवश्यकता आहे हे लक्षात घ्यावे.

*परीक्षेसाठी आवश्यक –
१. परीक्षेची भीती होकारार्थी भावनांनी व विचार पद्धतीनी घालवता येते.
२.सर्वसामान्य मुलेही नियमित अभ्यासामुळे असामान्य मुलांपेक्षा जास्त मार्क मिळवू शकतात.
३.परीक्षेची तयारी करताना वेळापत्रक बनवून अभ्यास करणे फायद्याचे ठरते.
४. महत्वाच्या ,मुद्द्यांना अधोरेखित करा.         
     
– सौ. मावळंकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu