गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान
पुणे: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अँड रिसर्च फॉर वूमेनतर्फे उद्योग जगतामध्ये आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावत ठेवणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्यजित पाटील, रूपा वेंकटकृष्णन, संस्थेच्या संचालिका डॉ. सूर्या रामदास उपस्थित होत्या. पाटील म्हणाले, “स्त्रियांचा कंपनीच्या कामकाजातील सहभाग वाढविणे गरजेचे आहे. प्रमाण साधारणत पन्नास टक्क्यांपर्यंत असावे “तर रूपा वेंकटकृष्णन म्हणाल्या, “आपल्या स्वरांना बळ देताना सामाजिक व सोशल मीडियाचा दबाव योग्यरीतीने हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. “डॉ. सुवर्णा ढमढेरे व प्रा. प्रियांका पोतदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
सौ. सकाळ ,पुणे .