दिवाळीसाठी खास पुरुषांच्या व लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन ट्रेंड्स …

दिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण या सणाला काही दिवसच शिल्लक असल्याने बाजारात खरेदीला वेग आला आहे. तस म्हटलं तर दिवाळीच शॉपिंग बायकांचा खास उत्साहाचा आणि आवडीचा भाग ,पण यंदा पुरुषांच्या आणि लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन चे देखील वेगवेगळे ट्रेंड्स मार्केट मध्ये दिसत आहेत. शॉपिंग फक्त महिलांसाठीच असं नाही. यंदा पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठीही खास पॅटर्न बाजारात इन झाले आहेत.
पुरुषांच्या पठाणी, जीन्स, इंडो वेस्टर्न, पटियाला, जोधपुरी, पठाणी कुर्ता, धोती पॅटर्न डिझायनर सूट यांची चलती आता दुकानात आहे. याचबरोबर प्रिंटेड शर्ट, होजिअरी स्लिव्हज या प्रकारच्या शर्टलाही वाढती मागणी वाढते आहे.

तर, मुलांसाठी खास दिवाळी स्पेशल धोती, डिझायनर कुर्ते, मोदी जॅकेट, डिझायनर शर्ट यांची चलती सध्या बाजारात आहे. लहान मुलांना साजेसे असे सुरेख वेलवेट शर्टदेखील लहानग्यांचे लक्ष वेधत आहे. तर मुलींकरिता ट्रेडिशनल स्कर्ट, पलाझो, बॉल गाऊन यांची चांगलीच चलती आहे. सध्या इंडोवेस्टर्न कुर्ते सणावारासाठी खास खरेदी केले जातात. हे कुर्ते खास राजस्थानातील कारागिरांकरवी बनवले जातात. सिल्क बनारसी, टंचोई, डुपेन, रॉ सिल्क या मटेरिअलमध्ये कुर्ते बाजारात इन आहेत.

कुर्त्यांबरोबारच नेता जॅकेट ची क्रेजही अजून कायम आहे. कॉटन, लिनन, इंपोर्टेड फॅब्रिक या कपड्यांत हे जॅकेट्स कुर्त्याची शोभा एकदम वाढवतात हे जॅकेटस 700 रुपयांपासून पुढे आहेत. तसेच काही बंदगळा पॅटर्न जॅकेट तसेच वेलवेट कॉलर जॅकेट हे पर्यायही खुले आहेत.
लहान मुलांसाठी सुद्धा बाजारात खूप नवीन पर्याय उपलब्ध आहेत.मुलांसाठी डिझाईनर कुर्ते आणि वेलवेट जॅकेट , मोदी जॅकेट आणि मुलींसाठी नेट, कॉटन, सिल्क या कापडांत पलाझो पॅटर्न उपलब्ध आहे. वेगळा आणि लोकप्रिय पॅटर्न म्हणून सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. एक हजार रुपयांपासून हा पॅटर्न ग्राहकांना खरेदी करता येतो. मुलींसाठी पारंपारिक पोशाखांमध्ये थोडीशी नवीनता आणून लेहंगे , चनिया चोळी इ. मधील विविधताही बाजारात बघायला मिळत आहे.
लेडीज वेअरमध्ये सध्या लॉंग टॉप विथ पलाजो, शॉर्ट टॉप विथ पलाजो, हॅरम या प्रकारांना तरुणींची पसंती आहे. पारंपरिक पद्धतीत अनारकली, कुर्ता, घागरा हे प्रकारही तरुणींच्या विशेष आवडीचे आहेत.

मुंबईत हिंदमाता मार्केट , मालाड मार्केट, बांद्रा लिंकिंग रोड, कोलाबा कॉजावे , इर्ला मार्केट , हिल रोड तर पुण्यात तुळशी बाग , लक्ष्मी रोड, हि ठिकाणे दिवाळीचे शॉपिंग करणार्यांनी भरून गेली आहेत . मग तुम्हीही करा भरभरून शॉपिंग आणि घ्या दिवाळीचा मनमुराद आनंद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu