‘एक गरम चाय की प्याली हो’
पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायल जाणार एकमेव पेय म्हणजे चहा. भारताबरोबरच नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया ,मलेशिया ,व्हिएतनाम ,आफ्रिका देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केला जातं. चहाचा शोध नेमका कोणत्या देशात लागला हे जरी सांगता येत नसलं तरी चहाची नोंद सगळ्यात पहिल्यांदा चीनमध्ये झालेली आढळते.
भारतामध्ये वधूवर संशोधनाच्या वेळी चहा पोह्यांचा कार्यक्रम होतो, जपानमध्ये चहा सादर करण ही कला मानली जाते. या चहाला आपण चहा या नावाने जरी संबोधलं तर याचे अनेकविध प्रकार आपल्याला जगभरात चाखायला मिळतात.
लेमन टी ,ऑरेंज टी ,पायनॅपल टी ,स्ट्रॉबेरी टी ,ग्रीन टी आईस टी असे भरपूर प्रकारचे चहा सध्या उपलब्ध आहेत.
ग्रीन टी चं म्हणाल तर ग्रीन टी सध्या हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झाला आहे . तर ग्रीन टी मध्ये भरपूर अँटी ऑक्सीडेंट असतात .
जगातला पहिला चहा कसा तयार झाला याची नोंद चीनमधल्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीने लागते.चीनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी शेन नग चिनी राजा होता. तो प्रयोगशील होता. कलेचा भोक्ता होता. त्याच राज्याचा विस्तार मोठा होता.तो एकदा एका लांबच्या ठिकाणी जात असताना मध्ये विश्रांतीसाठी थांबला होता आणि पिण्यासाठी त्याने आपला नोकरांकडे गरम पाणी मागितले. ते पाणी उकळताना बाजूच्या झाडांचा पाला त्यात पडला आणि त्या पाण्याचा रंग करडा झाला. राजा संशोधन वृत्तीचा असल्यामुळे हे काय आहे ते बघण्यासाठी तसेच पाणी राजा प्यायला आणि त्याला तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा असेल असे आज मानले जाते.
या चहाच्या अनेक प्रकारांची काही प्रकार आपल्यासाठी येथे आम्ही दिले आहेत .
मसाला चहा
पावसाळ्यात किंवा थंडीत थंड वातावरणात मस्त मसाला टाकून चहा घेण्याची मजाच और !
मसाला टी
साहित्य :
दोन कप पाणी ,दोन चमचे साखर ,दोन चमचे चहा पूड,अर्धा कप दूध आणि एक चमचा चहाचा मसाला.
मसाल्याची कृती – ५० ग्रॅम, सुंठपूड, लवंग, वेलदोडे, जायफळ, दालचिनी, काळीमिरी, बडिशेप ह्यांची पूड प्रत्येकी एक चहाचा चमचा. हे सर्व मिश्रण एकत्र करून एका बाटलीत भरून ठेवावे.
कृती :
प्रथम पाणी आणि साखर एकत्र उकळून घेणे. नंतर देशात चहाचा मसाला टाकून पुन्हा उकळा.नंतर चहा पूर्ण झालं तीन मिनिटं झाकून ठेवा .त्यानंतर गाळून त्यात दूध घाला आणि गरमगरम चहा द्या .
आइस टी :
२ ग्लास पाणी ,दीड चमचा चहाची पूड आणि दोन चमचे साखर.
कृती :
पाणी आणि साखर एकत्र उकळून घ्या.त्यात चहा पूड घालून तीन मिनिटं झाकून ठेवा.त्यानंतर गाळून झाकून ठेवा.थंड झाल्यावर त्यात संत्र्याच्या किंवा मोसंबीचा,लिंबाचा रस एकत्र करा.आणि मग हे मिश्रण दोन तीन तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.अंतर थंडगार आईस टी द्या.
मोगली चहा :
चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा पावडर, एक कप दूध, जायफळ, जायपत्री, वेलदोडा लवंग केशर ह्यंची पूड प्रत्येकी पाच चमचा.
कृती : पाणी आणि साखर उकळवून घ्यावे. त्यात सर्व पुडी टाकून पुन्हा एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहापूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावे. गाळून घ्यावा. गरम प्यावा.
काश्मिरी काहवा :
चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा, दहा-बारा बदामांचे काप, पाव चमचा केशर.
कृती : पाणी साखर उकळावे. त्यात चहा टाकावा. तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंर गाळून त्यात बदामाचे काप आणि केशर टाकावे
व्यक्ती तितक्या प्रक्रुती , या उक्ति प्रमाणे आपापल्या रुचिनुसार सगळ्या आवश्यक घटकांच्या मिश्रणाला हवे तितके उकळून , गरम थंड हवा तसा प्रत्येकजण घेतो. प्रत्येकाची आवड आणि करण्याच्या पध्दतीत फरक असल्याने प्रत्येकाच्या हाताच्या आणि घरच्या चहा ची चव वेगवेगळी असते.
घरांत असा हवा आणि तसाच हवा असे चोचले करणारा माणूस पण बाहेर गेल्यावर चहाची वेळ झाली की जसा मिळेल तसा चहा मुकाट घेतो. कोणताही ज्युस, शीतपेय अगदी आइसक्रीम देखील चहा चा पर्याय म्हणुन चहाबाजाना चालत नाही. रस्त्यावरील हातगाडी पासून पंचतारान्कित हॉटेल पर्यंत सर्वत्र हा मिळतो. कामगारां पासून मालकां पर्यंत कलंदर कलावंतापासून रसिक प्रेक्षकाच्या पर्यंत सगळ्यांच्या ओठी हा लागतो. उगाचच नाही इहलोकीचे अमृत याला म्हणत.
pc:google