‘मॉन्सून शॉपिंग’
पावसाळा आला की मॉन्सून सेल ची धमाल सुरु होते. मुंबईत, पुण्यात अनेक मॉल्समध्ये अनेक ब्रँड्सवर सेल सुरु होतात.हे सेल साधारणत: ऑगस्ट मध्यापर्यंत चालू असतात. आपला वॉर्डरोब नव्याने सजवण्यासाठी ही उत्तम वेळ असते. तसेच पावसाळ्यात पर्स, चप्पल, घड्याळे अगदी कपडे सुद्धा भिजले की खराब होतात. म्हणूनच पावसाळ्यात कोणत्या गोष्टींची काळजी कशी घ्याल आणि या मॉन्सून सेल ची मजा घेत रस्ता शॉपिंगही कुठे कराल याबद्दल काही टिप्स …..
चप्पल :
पावसाळ्यात लेदरच्या चप्पल किंवा बूट वापरणं अगदी शक्य नसतं कारण पाण्याने भिजल्यावर त्याची पुरेपूर वाट लागते. म्हणूनच पावसाळ्याचा विचार केला तर बाजारात वगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक , सिलिकॉन आणि रबराच्या चपलाही आल्या आहेत. पावसाळी चापालांमध्ये चॉकलेटी , काळा, पांढरा असे नेहमीचे रंग न दिसता ट्रेंडी असे निळा, गुलाबी, पिस्ता, केशरी, पिवळा असेही रंग दिसत आहेत.
मुंबईत आणि पुण्यात चालू असलेल्या मॉन्सून सेल मध्ये तुम्हाला मोची , मेट्रो, लॉर्डस , आदिदास , वूदलंड अशा ठिकाणी ५० % पर्यंत सवलत दिसेल. पण जर तुम्ही रस्ता शोपिंगाचे शॉकिन असाल तर लिंकिंग रोड , फॅशन स्ट्रीट, पवई मार्केट , दादर मार्केट किंवा पुण्यात म्हटलंत तर तुळशी बाग अशा ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील. अगदी फलॅट हिलच्या निरनिराळ्या रंगाच्या चप्पल्स पासून क्रॉक्सच्या डिझाईन्स पर्यंत खूप पर्याय उपलब्ध आहेत. हल्ली बाजारात नवीन आलेल्या नॉन लेदर बॅग्स मध्येही नवीन व्हरायटीज आहेत ज्यात काही बॅग्सना रेनकोट किंवा कव्हरची सुविधा ही उपलब्ध आहे.
मॉन्सून सेलचा महत्वाचा भाग म्हणजे कपडे सध्या pantaloons, Shoppers Stop, levis, Life Style, United Colors of Benetton अशा ब्रँड्स मध्ये आणि लहान मुलांच्या Jinni and Jony, Lilliput, Barbie ब्रँड्समध्ये ५० % पर्यंत सूट आहे .
आपल्या वॉर्डरोबला नवीन लूक द्यायचा असल्यास तुम्ही खुशाल या दुकानांमध्ये एखादी चक्कर मारू शकता.

