सेंटर फॉर ई-गव्हर्नन्स ट्रेनिंग अँन्ड रिसर्च, पुणे आयोजित सामाजिक संस्था व्यवस्थापन कार्यशाळा
सेंटर फॉर ई-गव्हर्नन्स ट्रेनिंग अँन्ड रिसर्च, पुणे ही संस्था ई – शासन संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या वतीने शासनाच्या विविध योजना, कायदे तसेच ई – शासन प्रणाली आणि महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी व संवर्धनासाठी सामाजिक संस्थांशी संबंधित विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.
त्याचाच एक भाग म्हणून आम्ही संस्थेच्या वतीने दिनांक ०८ व ९ सप्टेबर,२०१८ रोजी “ सामाजिक संस्था व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करीत आहोत.
कार्यशाळा दिनांक : ८ व ९ सप्टेबर,२०१८
वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३०
प्रवेश शुल्क : १५००/- प्रती व्यक्ती.
कार्यशाळेत पुढील विषयांवर मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
पहिला दिवस :- ८ सप्टेबर,२०१८, शनिवार
संस्था नोंदणी कायदा – तरतुदी व कार्यवाही
वार्षिक अंदाजपत्रक
लेखापरीक्षण आवश्यक नोंदी व आर्थिक शिस्त
संस्थेचे प्रलेखन, कार्यवृतांत व अहवाल
बदल अर्ज
दुसरा दिवस – ९ सप्टेबर, २०१८, रविवार
आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी करावी लागणारी पूर्तता
कार्यालयीन व्यवस्थापन
संस्थेचे जनसंपर्क, प्रचार व प्रसिद्धी
निधी संकलन
विशेष सूचना :
· कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश आहे.
· एका संस्थेच्या माध्यमातून १ अथवा २ व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल.
· कार्यशाळे दरम्यान संस्था मार्गदर्शक पुस्तिका व कार्यशाळा किट देण्यात येईल
· आयोजकांकडून चहा, नाश्ता व दुपारचे जेवण याची व्यवस्था करण्यात येईल ..
· बाहेर गावी असणाऱ्या व्यक्तींनी प्रवास खर्च व राहण्याची व्यवस्था स्वतः करायची आहे.
तरी कृपया या कार्यशाळेसाठी आपण अथवा आपले प्रतिनिधी यांनी नाव नोंदणी करावी अथवा ही माहिती योग्य व्यक्तींना कळवावी ही नम्र विनंती.
धन्यवाद !
सेंटर फॉर ई-गव्हर्नन्स ट्रेनिंग अँन्ड रिसर्च, पुणे

