Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Pune latest news in Marathi,Pune news in marathi |Townpune.com
दुकाने, मॉल, सिनेमागृहे आता २४ तास खुली
Latest Pune news in Marathi
Thursday, 30 June 2016 04:35

दुकाने, मॉल, सिनेमागृहे आता २४ तास खुली

देशातील दुकाने २४ तास व आठवडय़ाचे सातही दिवस खुली ठेवण्याच्या नमुना कायद्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार दुकाने, मॉल्स व चित्रपटगृहे सातही दिवस २४ तास खुली ठेवता येऊ शकतील. या कायद्यानुसार उत्पादन प्रकल्प वगळता १० किंवा अधिक कामगार असलेल्या दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहे यांना ३६५ दिवस त्यांचे काम खुले ठेवण्याची परवानगी दिली जाईल व त्यांना संबंधित आस्थापन केव्हा बंद ठेवायचे, केव्हा खुले ठेवायची यासाठी मुभा असेल. महिलांना पुरेशा सुरक्षेत रात्रपाळीत काम करण्याची परवानगी दिली जात असून कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, उपाहारगृह, प्रसाधनगृह व प्रथमोपचार सेवा असणे आवश्यक राहील. ‘द मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट (रेग्युलेशन अँड कंडिशन ऑफ सव्‍‌र्हिसेस बिल’ २०१६) मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात येत आहे.

Read more...
 
अन्नदान करा; पण पदार्थाचा दर्जा सांभाळूनच!
Latest Pune news in Marathi
Thursday, 30 June 2016 03:56

अन्नदान करा; पण पदार्थाचा दर्जा सांभाळूनच!

वारीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना वारीच्या मुक्कामी अनेक संस्था व संघटना अन्नदान करण्यास इच्छुक असतात. परंतु मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या या अन्नदान कार्यक्रमांमध्ये रस्त्यावर बनवल्या जाणाऱ्या आणि तिथेच वितरित होणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ शकते. या पाश्र्वभूमीवर स्वच्छ हात, स्वच्छ जागा, शुद्ध पाणी आणि ताजे अन्न हे चार नियम अन्नदान करणाऱ्यांनी पाळावेत, अशा सूचना ‘अन्न व औषध प्रशासना’तर्फे (एफडीए) दिल्या जात आहेत. पुण्यात जिल्ह्य़ाच्या भागात वारीकाळात अन्नपदार्थ विक्रेत्या दुकानांच्या तपासण्या करण्यासाठी ‘एफडीए’ने अकरा पथके नेमली आहेत. अन्नदान करणाऱ्यांना सूचना देण्याबरोबरच पालखीच्या मुक्कामाच्या आसपास असलेली मिठाई दुकाने, खाद्यपदार्थाचे स्टॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फळविक्रेते यांच्या तपासण्या करून त्यांनाही पदार्थाचा दर्जा सांभाळण्यास सांगितले जात आहे, असे अन्न विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले.

Read more...
 
पिंपरी पालिकेकडून २९ किलोमीटर लांब वर्तुळाकार वाहतूक मार्गाची प्रक्रिया सुरू
Latest Pune news in Marathi
Thursday, 30 June 2016 03:50

पिंपरी पालिकेकडून २९ किलोमीटर लांब वर्तुळाकार वाहतूक मार्गाची प्रक्रिया सुरू

दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन सव्‍‌र्हेक्षण करणार िपपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक सुलभ व सुरक्षित व्हावी, यासाठी महापालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये २९ किलोमीटर लांब व ३० मीटर रुंदीचा वर्तुळाकार मार्ग आरक्षित केला. मात्र, अनेक वर्षांपासून तो कागदावरच राहिला. बऱ्याच उशिरा का होईना महापालिकेने भविष्यातील वाहतुकीचा विचार करून या उच्च क्षमता वाहतूक मार्गाची (एचसीएमटीआर) प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसीएल) कंपनीची सल्लागार कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना या संदर्भातील सर्व आवश्यक बाबींचे सव्‍‌र्हेक्षण करण्याचे काम देण्यात येणार आहे. सात महिने मुदतीच्या या कामासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Read more...
 
पालख्यांच्या आगमनाने संचारले भक्तिचैतन्य
Latest Pune news in Marathi
Thursday, 30 June 2016 03:47

पालख्यांच्या आगमनाने संचारले भक्तिचैतन्य

माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे उत्साहात स्वागत

पंढरीचा महिमा। देतां आणीक उपमा।। ऐसा ठाव नाही कोठे। देव उभा उभी भेटे।।

पंढरीनाथाच्या भेटीची आस घेऊन त्याच्या नामाचा अखंड घोष करीत निघालेल्या लाखो वैष्णवांच्या संगतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे बुधवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पालख्यांच्या आगमनाने शहरात जणू भक्तिचैतन्यच संचारले. पुणेकरांनी दोन्हीही पालख्यांचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केले. भक्तिकल्लोळ करीत शहरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संस्था, संघटना, मंडळे व नागरिकांनी वेगवेगळे उपक्रम राबविले. दोन्ही पालख्या गुरुवापर्यंत शहरात मुक्कामी आहेत. शुक्रवारी (१ जुलै) पालख्या शहराचा निरोप घेतील. आळंदीतून मंगळवारी प्रस्थान झालेली माउलींची पालखी मुक्कामानंतर बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाली.

Read more...
 
हिंदुस्तानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्त्रबुद्धे यांचे निधन
Latest Pune news in Marathi
Thursday, 30 June 2016 03:43

हिंदुस्तानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्त्रबुद्धे यांचे निधन

हिंदुस्तानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्त्रबुद्धे यांचे बुधवारी रात्री येथे निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत. त्यांची ख्याल व भजन गायकी अत्यंत रसिकप्रिय होती. त्यांचे वडील शंकर श्रीपाद बोडस हे प्रख्यात गायक पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. त्यांच्याकडूनच गायकीचे प्राथमिक धडे वीणाताईंनी गिरविले. त्यानंतर मोठे बंधू काशिनाथ, पं. बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठक्कर आणि पं. गजाननराव जोशी यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले.

Read more...
 


Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla