Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Travel in Pune|Pune Travel
गुलाल उधळीला जणु !
Travel All Articles

गुलाल उधळीला जणु !

darjeeling tourism2आम्ही वीस माणसे कलकत्त्याहून जलपायगुडी येथे आलो. डोशांचा भरपूर समाचार घेतला. चहा पिऊन दार्जीलिंग येथे जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो, छोटी गाडी, रेल्वेच्या रुळांच्या अगदी जवळून जाणारा बसचा रस्ता पाहून मजा वाटत होती.( खरे तर आराधना पिक्चर ने या गाडीला अमर केले आहे ) न्यू जलपायगुडी येथे आमच्या गाडीच्या प्रत्येक तीन डब्यांना एक इंजिन जोडले. एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या व त्या झुक झुक करत निघाल्या. लांब अंतरावरून दिसणाऱ्या धुरावरून आमच्या गाडीचा एखादा भाग कुठे आहे हे ओळखता येत होते.स्टेशनला प्लेटफोर्म असा नव्हताच. गाडी थांबायची,उतरून समोरच्या दुकानातून फळे आणेपर्यंत गाडी फुसफुसत थांबलेली असायची.खूप गम्मत वाटायची. चढण चढताना गाडी सरळ वळण न घेता , अर्धे वळण घेऊन अर्ध्या वळणावर उलट चालायची, अशी गम्मत तर कुठेच अनुभवली नव्हती.दोन्ही बाजूच्या उतारावरून चहाचे मळे आमच्या स्वागतास सिद्ध होते. त्या हिरव्या रंगात दंग असताना दार्जीलिंग पटकन आलेसे वाटले.

Read more...
 
देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे
Travel All Articles

देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे

नवरात्रोत्सवाला आता प्रारंभ होत असून प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.


mahalaxmi mata kolhapurपहिले शक्तीपीठ- श्रीमहालक्ष्मी माता (कोल्हापूर)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मी-देवीचा सदैव वास असतो.
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे.देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

Read more...
 
पावसाळी पिकनिकची ठिकाणे.
Travel All Articles

खास पावसाळी पिकनिक साठी … (पावसाळी पिकनिकची ठिकाणे)

malshej-ghatनुकताच पावसाळा सुरु झाला  वातावरणात कमालीचा गारवा तयार झाला. अशा या चिंब पावसात भिजण्याची आणि आनंद लुटण्याची तयारी लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वाची असते. तरुणांचे  कुठे ट्रेकला जाण्याचे तर कुठे वन डे पिकनिकला जाण्याचे बेत सुरु होतात. कोणी  आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत तर कोणी  आपल्या परिवारासोबत हा पावसाचा आनंद लुटण्यास वन डे पिकनिक का होईना फिरायला जाण्याचे बेत आखतात. मग कोणी माळशेज घाट तर कोणी अगदी लोहगड अशा अनेक ठिकाणी जाऊन पावसात भिजण्याचा आनंद पूर्ण करत. अशाच अनेक पावसाळी पिकनिक ठिकाणांची माहिती आपल्या वाचकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हा पावसाळी पिकनिक ठिकाणांचा घेतलेला आढावा.

Read more...
 
पाऊस वेड्यांचा पावसाळा !!
Travel All Articles

पाऊस वेड्यांचा पावसाळा !!

rainकवीच्या लेखणीतून कविता होऊन बाहेर पडणारा पावसाळा आला,
चिमुकल्यांच्या हातून होडी बनून पाण्यात वाहणारा पावसाळा आला,
मित्रांच्या सोबत चहाच्या टपरीवर गप्पा मारणारा पावसाळा आला,
आणि प्रेयसीसोबत समुद्रकिनारी भिजणारा पावसाळा आला……. 

आणखी बऱ्याच प्रकारे आपल्याला या ऋतूचे वर्णन करता येईल. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आपण या ऋतूला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलेले असते. ह्या पावसाळ्याची तयारी आपण पावसाळा सुरु होण्याच्या आधीपासूनच करत असतो. पावसाळ्याची शॉपिंग ते बाहेर फिरायला जाण्याची ठिकाणं ठरवण्यापर्यंत सगळे काही ठरवून आपण मोकळे होतो. एखादा दिवस मुंबई जवळ एखाद्या सुंदर अशा हिल स्टेशन वर किंवा धबधबा असलेल्या ठिकाणी जाण्याचा किंवा ट्रेकिंग ला जाण्याचा  आपण बेत आखतो. परंतु तिथे गेल्यावर आपला पार हिरमोड होतो कारण आपल्यासारखेच खूप जण असा बेत आखून आलेले असतात. आणि त्या शांत ठिकाणी जणू जत्राच भरलेली असते. अशा वेळी आपण त्या गर्दीत धिंगाणा घालण्याव्यातिरिक्त काहीही करू शकत नाही. 

Read more...
 
Travel Insurance article
Travel All Articles

प्रवासी विमा पॉलिसी        

कदाचित आपणास माहिती नसेल म्हणून ......
सर्वसाधारणपणे परदेशी जाणाऱ्या लोकांसाठी जो विमा केला जातो त्यामध्ये काही अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टींचा समावेश केला जातो. जसे की,
१. वैद्यकीय मदत (Medical Insurance ) ज्याच्यामध्ये जर का आपणास परदेशात असताना रुग्णालयात जाण्याचा प्रसंग आला तर त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.
२.प्रवासाच्या दरम्यान जर तुमचा पासपोर्ट हरवला तर तो परत मिळवून घेण्यासाठी जो खर्च येतो त्याची भरपाई मिळू शकते.
३. अपघात : जर कोणत्याही कारणास्तव कोठेही कधीही अपघात झाला आणि त्यामुळे शारीरिक हानी झाली तर त्यासाठी सुद्धा भरपाई मिळू शकते.
४.    प्रवासात जर बॅगेज हरवले तर त्यासाठी सुद्धा भरपाई मिळू शकते.
५. परदेशात गेल्यानंतर विमानतळावर आपणास आपले समान जर १२ तासांपेक्षा जास्त उशिराने मिळाले तर त्यासाठी सुद्धा भरपाई मिळू शकते.
६. परदेशात वास्तव्य असताना तुमच्या निष्काळजीपणामुळे जर कोणाचे वैयक्तिक नुकसान झाले तर त्याला विमा संरक्षण मिळू शकते. 

Read more...
 


Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla