Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Food in Pune |Pune Food
Famous Eating Places in Pune -पुणे - खाद्य भ्रमंती
Food All Articles

माझी खाद्य-भ्रमंती

Misal Pavभटकंतीच्या निमित्ताने एखाद्या सुंदर ठिकाणी जमेल त्या वेळी, जमेल तेव्हा, जमेल त्यांचा बरोबर फिरणे हा नियम मी पाळत आलेलो आहे.भटकंतीतून आनंद मिळवणे आणि आनंदातून भटकंती हे चक्र सदैव फिरत असते.अश्याच भ्रमंतीमधून मग अनेक चांगले गुण,छंद,आवडी जोपासल्या जातात.वास्तविक कुठलीही भ्रमंती ही एखाद्या विशिष्ठ स्थळाशीच एकरूप असते.पण कुठल्याही भटक्यांनी ही मर्यादितता फक्त स्थळापुरतीच मर्यादित न ठेवता तिथला निसर्ग,प्राणी-पक्षी,उत्सव,संस्कृती यांच्याशीही जुळवून घेतले पाहिजे.कुठल्याही संस्कृतीत प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात.एक म्हणजे 'आद्यसंस्कृती'आणि दुसरी 'खाद्यसंस्कृती'.माणूस हा पहिल्यापेक्षा दुसऱ्या संस्कृतीशी जास्त जवळून एकरूपता दाखवतो.माझ्याबाबतीतही नेमके तेच झाले.या खाद्यासंकृतीशी एकरूप होण्याचे बाळकडु मला भारताच्या सांकृतिक राजधानीत राहून रुजत गेले.

Read more...
 
संत्र्याच्या विविध रेसिपीज …
Food All Articles

संत्र्याच्या विविध रेसिपीज …

संत्र हे फळ दोन हंगामात येतं.संत्र्यात लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. संत्र्याने रक्तवृद्धी होते. अशा बहुगुणी नारंगीच्या या वेगळ्या रेसिपीज् यावेळच्या फूड कोर्ट मध्ये … 
 
 
संत्र्याचे पुडिंग
orange puddingसाहित्य :- कस्टर्ड  पावडर ६ चमचे  ऑरेंज  फ्लेवर , साखर ६ चमचे , साखर ४ चमचे केरेमलसाठी  , अगर -अगर ६ चमचे , दुध ५ कप . सजावटी साठी ताज्या संत्र्यांचा गर  .
कृती :-
दीड कप पाण्यात अगर अगरचे तुकडे भिजवून एक तासाने मंद ग्यासवर विरघळून घ्या . ४ चमचे साखर व २ चमचे पाणी पुडिंग मोल्डमध्ये घालून मंद ग्यासवर साखर हलकी तपकिरी होईपर्यंत ठेवून  पूर्ण मोल्डमध्ये पसरवून  बाजूला ठेवा .
ऑरेंज  जम व साखर ६ चमचे मंद ग्यासवर साखर विरघळेपर्यंत ठेवा . अर्धा कप थंड दुधात कस्टर्ड  पावडर मिक्स करून घ्या . उरलेले दुध उकळत ठेवून उकळी फुटल्यावर कस्टर्ड करून घ्या . थोडे घट्ट झाले कि उतरवा . त्यात अगर अगर चे मिश्रण घालून २ मिनिटे उकळवा . थोडे थंड झाल्यावर  जॅम  व साखर घालून मोल्डमध्ये ओता . सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा . नंतर प्लेटमध्ये उपडे करून वरून आवडत असल्यास संत्र्याच्या गराने सजवून सर्व करा . 

Read more...
 
गुळाची पोळी ,तिळगुळाचे लाडू ,चुरमुरयाचे लाडू
Food All Articles

"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"
गुळाची पोळी ,तिळगुळाचे  लाडू

मस्त थंडी पडलीय आणि अशा थंडीत स्निग्ध पदार्थ खावेत असे आरोग्यशास्त्र सांगते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत या महिन्यामध्ये तीळाचे पदार्थ खावेत असे सांगितले आहे.त्यातच थंडीत मकरसंक्रांत सण येत असल्याने या लाडवाला भारी मागणी असते सगळ्यात जास्त कॅल्शियम तिळात असते तिळात ई-जीवनसत्त्व असते यात जास्त फॅट्स असल्याने वजन वाढवण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तींनी हे लाडू या दिवसांत आवर्जून खावेत तिळातील ऑलेथिक ऍसिड वाईट कॉलेस्टेरॉल कमी करून चांगले कॉलेस्टेरॉल वाढवते शरीराला बाधणारे घटक तीळ कमी करतो त्यामुळे या हिवाळ्यात बिनधास्त तिळाच्या लाडवांवर ताव माऱा

Read more...
 
पुरण पोळी ,होळी स्पेशल थंडाई
Food All Articles

होळी रे होळी पुरणाची पोळी

पुरण पोळी

puranpoli

साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, १ वाटी गुळ, १ वाटी साखर, ६-७ वेलदोड्यांची पूड ,चिमुटभर जायफळ पूड, चिमुटभर हळद, २ चमचे तेल , अर्धा चमचा मीठ .

कृती :   डाळ धुवून त्यात ३ वाट्या पाणी, तेल हळद व मीठ घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर ती चाळणीत टाकावी आणि पाणी निथळू द्यावे. गुळ किसून घ्यावा किंवा बारीक चिरावा.पातेल्यात डाळ गुळ व साखर एकत्र करावे पातेले गेस वर ठेवावे. गुळ वितळायला लागला की गेस बारीक करावा.मंदाग्नीवर पुरण शिजवावे. हे मिश्रण हलवत राहावे. उलथने पुराणात उभे केले असता सरळ उभे राहिले की पुरण शिजले असे समजावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की पातेले उतरवून ठेवावे. त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावी. व पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावे किंवा पाट्यावर वाटावे म्हणजे ते लवकर व बारीक वाटले जाते.

Read more...
 
फूड कोर्ट -उपवासाचे चटकमटक
Food All Articles

'फूड कोर्ट -उपवासाचे चटकमटक'

धार्मिक कामे, उपासतापास करताना उपासाच्या दिवशी काय बर वेगळ करता येईल फराळासाठी ? हा प्रश्न कायमच पडत असतो. म्हणूनच तुमच्यासाठी खास उपवासाच्या रेसिपीज ......

sabudana-puriसाबुदाणा पुरी -

साहित्य - २ वाट्या साबुदाणे,२-३ उकडलेले बटाटे, पाव वाटी
शेंगदाण्याचा कुट, पाव लिंबू, १ चमचा मीठ, तळायला तेल , ६-७ ओल्या मिरच्या, पाव चमचा जिरे , २ चमचे साखर हे साहित्य पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे.

कृती :
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिसळून घ्यावे.प्लॅस्टिकला  तेलाचा हात लावून जाड , जाड पुऱ्या थापून मंद गॅसवर पुरीप्रमाणे तळा आणि चटणी बरोबर गरम गरम खायला द्या.

Read more...
 
उन्हाळ्यातील खवय्येगिरी
Food All Articles

उन्हाळ्यातील खवय्येगिरी 

चैत्र महिना सुरू झाला की आपल्या कडे सुरु होती ती आंबाडाळ, छुंदा आणि पन्हे करण्याची लगबग तसे हे पदार्थ आपल्याकडे करण्याची प्रथा आहे. या वेळेला हिरव्यागार कैऱ्या यायला लागतात आणि एप्रिल, मे चा कडक उन्हाळा पन्ह्यामुळे जाणवत नाही. यावेळेस हे पदार्थ कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत...


आंबाडाळ

 

साहित्य - चणाडाळ- १ वाटी, कैरीचा कीस- अर्धी वाटी, हिरवी मिरची-१, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार साखर – मीठ, फोडणीसाठी तेल-३-४ टी स्पून, मोहरी- १ चमचा, हिंग-१ चमचा, हळद- १ चमचा
ओले खोबरे सजावटीसाठी (पाहिजे असल्यास)
कृती - डाळ बुडेल एवढ्या पाण्यात २-३ तास भिजवावी. भिजलेली डाळ,हिरवी मिरची,मीठ,साखर मिक्सर मधे वाटावी. (फार बारीक वाटू नये तसेच जास्त पाणी घालू नये.) त्यात कैरीचा कीस घालावा आणि नीट एकत्र करावे. तेल तापवून मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी. थोडी गार झाल्यावर त्यात हळद घालावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणात ओतावी आणि सर्व नीट एकत्र करावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास खोबरे घालावे. थंड झाल्यावर खावी.

Read more...
 
Summer Cool Juices...
Food All Articles

Summer Cool Juices...

juiceMaintaining a healthy diet in summer is a concern for most individuals in the modern world.The sun is shining and the mercury levels are soaring, you know the summer is here and there is no escape from it. It is a season where energy levels and appetite are low and a slightest activity causes the sweat to flow off your back and face. Life goes on and it is very necessary to cope with the heat to avoid the usual problems of dehydration, heatstroke and a feeling of lethargy. The best way to beat the heat is to eat the right food. Eating the right type of food makes the summer pleasant and enjoyable.

Read more...
 
आपले सण आपली पक्वान्ने
Food All Articles

आपले सण आपली पक्वान्ने

gudhi thumbआपल्याकडे प्रत्येक सणाचे फार महत्व आहे. त्या दिवशी पारंपारिक पद्धतीने ठराविक पक्वान्ने करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या कुटुंबाच विस्तारलेलं क्षितीज पाहता, काळाबरोबर धावण्याची स्पर्धा करीत असताना, आपली मुळ कुठ रुजली आहेत याच भान जाग रहाव हेच या सदरचे मुख्य उद्दिष्ठ आहे. स्वयंपाक घराशी केवळ गृहिणीचच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच अतूट नात आहे. ते अधिक सर्जनशील, नाविन्यपूर्ण, सहभागाच आणि आरोग्यदायी व्हावं यासाठीच आम्ही हा विविध पाककृतींचा यशस्वी उपक्रम या सदराद्वारे राबवीत आहोत.

Read more...
 
आली दिवाळी ताट सजवू फराळांनी
Food All Articles

आली दिवाळी ताट सजवू फराळांनी  

diwali-faral-500x500फराळाच्या पारंपारिक कृतींच महत्व जराही कमी झालेले नाही परंतु तरीही त्या कृतींना आधुनिकतेची जोड देऊन हे चवींच फ्युजन देखील लोकप्रिय होत आहे.
दिवाळीच्या फराळाच्या अशाच काही नाविन्य पूर्ण पाककृती .....

बेसनाचे लाडू:
साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप.
कृती : बेसन तुपात छान भाजून घ्यावे, भाजल्यावर छान खमंग वास आला पाहिजे, रवा  सुद्धा छान भाजून घ्यावा.राव व बेसन छान एकत्र करावे व थोडेसे कोमात होऊ द्यावे.मग पिठी साखर घालून छान मळावे. नंतर वेलचीपूड ,काजू काप , मनुका, बेदाणे टाकून छान बारीक लाडू वळावेत.

Read more...
 
Must have food items to enjoy this monsoon & food for rainy season.
Food All Articles

Must have food items to enjoy this monsoon & food for rainy season.

FOOD FOR RAINY SEASON:

CHAI GARAM CHAI GARAM …..

food for monsoonHot tea or Masala tea, Cinnamon Tea any kind of tea in this cold and rainy weather is the best thing one could ever drink. Popularly known as ‘Cutting Chai’ can beat all other drinks this season. No need of any fruit juice or Lassi or milkshake , just one cup of tea and you can feel most comfortable in the monsoon.

BHAJIAS AND PAKODAS
Garmagaram Kanda, Batata , Mirachi or any pakodas is the most desired food for rainy season in every house.From garma garam besan ka pakoda to bread pakoda to any stuffed pakoda is the tastiest when combined with the ‘Cutting Chai’.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image

twiter


 

 

 

 

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla